प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांतून जावे लागते. हे टप्पे म्हणजे शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य, आणि निवृत्त जीवन.
प्रत्येकाच्या आयुष्यात शैक्षणिक टप्पा खूप महत्वाचा असतो कारण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असतो. जर पाया भक्कम असेल तर आयुष्य पुढे आनंद, प्रेम, आणि हर्षाने भरून जाते. मात्र, आयुष्याचा पायाच कच्चा राहिला तर आयुष्याची स्थिती दयनीय होऊन जाते. आपल्या सभोवतालची हजारो मुले शिक्षणाअभावी भयंकर परिस्थितीत जगताना आपण पाहू शकतो.
सामान्यपणे, मुले शिक्षणासंबंधित खालील समस्यांचा सामना करतात: